
सामना प्रतिनिधी । नगर
महाराष्ट्राचा श्वास व ध्यास, शिवसेनेचे आराध्य दैवत माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शनिवारी नगर शहर शिवसेनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, नगर जिल्हा दक्षिण प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, सुरेश तिवारी, दत्ता कावरे, अनिल लोखंडे, गिरीश जाधव, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुषमा पडोळे, शहर प्रमुख अरुणा गोयल, उपशहर प्रमुख शारदा सोनवणे, लता पठारे विभाग प्रमुख, आशा गायकवाड, शिवसेनेचे सचिन शिंदे, अशोक दहिफळे, युवा सेनेचे रवी वाकले, गौरव ढोणे, दादा भोसले, वृषभ भंडारी, लंकेश हरबा, सुमित कुलकर्णी, सतीश मैड, संग्राम दादा शेळके आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आले.































































