शिंदखेडा येथे एक हजार 111 फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती

45

सामना प्रतिनिधी, शिंदखेडा

जिल्ह्यातील शिंदखेडा येथे प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रध्वजाच्या एक हजार 111 फूट लांबीच्या प्रतिकृतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील अबालवृद्धांसह राजकारणीही सहभागी झाले होते. गावाच्या मुख्य रस्त्यांवरून भल्या मोठय़ा आकाराचा राष्ट्रध्वज मिरविण्यात आल्याने गावातील वातावरण भारावले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिंदखेडा येथील शाखेने हा उपक्रम राबविला. गावातील एन.डी. मराठे माध्यमिक विद्यालयाच्या आवारातून राष्ट्रध्वजाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सकाळी दहाला राष्ट्रध्वजाचे आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित तरुणांनी भारत मातेचा जयजयकारच्या घोषणा दिल्या. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधीसभेचे सदस्य दिलीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, एस.आर. पाटील, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गटनेते अनिल वानखेडे, तहसीलदार सुदाम महाजन, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित निकत, नगरसेवक आणि शिंदखेडा शहरातील विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या