
सामना ऑनलाईन । लंडन
इंग्लंडच्या मँचेस्टर येथील व्हिक्टोरिया रेल्वे स्थानकात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका 25 वर्षीय तरुणाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत प्रवाशांवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. त्यात पन्नाशीतला एक इसम आणि एक महिला गंभीर जखमी झाली. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्यावर वार झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 12 इंचाचा धारदार चाकू जप्त केला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहीत धरून तपास सुरू आहे.

























































