उद्घाटनाला उशीरा बोलावले म्हणून आमदार संतापले, सर्वांदेखत अधिकाऱ्याची कॉलर पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार क्रृष्ण एम रेड़्डी यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेड्डी हे एका शिक्षण अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्याला मारायला जाताना दिसत आहेत. त्यांनी त्याला शिवीगाळ केल्याचेही या व्हिडीओत ऐकायला मिळते. सुदैवाने काही लोकंमध्ये आल्याने आमदार शांत झाले. मात्र या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून रेड्डी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.


गढवाल मधील जोगुलांबा येथील एका जिल्हा परिषद शाळेच्या उद्धाटन सोहळ्याला आमदार रेड्डी यांना उशीरा आमंत्रण देण्यात आले. तसेच ते पोहचायच्या आतच जिल्हा परिषद सचिवांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे रेड्डी हे संतापले होते. त्यादरम्यान त्यांना उशीरा आमंत्रण देणारा अधिकारी त्याच्या समोर आला. त्याला पाहून रेड्डी संतापले व त्यांनी त्या अधिकाऱ्याची कॉलर धरुन त्याला शिवीगाळ केली.