ट्विटरमध्ये हलकल्लोळ; सर्व कार्यालये आठवडाभर बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्याचा धडाका लावला आहे. त्यातच आता ट्विटर कंपनीचे सर्व कार्यालये बंद केले आहेत. पुढील आठवडय़ात हे कार्यालये खुले होतील. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे ट्विटरमध्ये हलकल्लोळ माजला आहे. परंतु कार्यालये का बंद केली याचे कारण मस्क यांच्याकडून देण्यात आलेले नाही.

एलॉन मस्क यांनी 27 ऑक्टोबरला सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरची खरेदी केली. त्यासाठी तब्बल 44 अब्ज डॉलर्स मोजण्यात आले. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी सर्वप्रथम सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांना हाकलले. त्यानंतर गेली 20 दिवस कर्मचारी हकालपट्टीचे सत्र सुरूच आहे.

ट्विटरमधील सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना आतापर्यंत घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आता तर पंपनीचे कार्यालये बंद केल्यामुळे गोंधळ आणखी वाढला आहे.