फिल्मसिटी दाखवण्याच्या नावाने लावायचे चुना, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावची चित्रनगरी दाखवतो असे सांगून परदेशी नागरिकांना चुना लावणाऱया रोहित कासारे आणि डेंझिल फर्नांडिस ऊर्फ डेन्झो या दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. हित रहमान हे तीन दिवसांपूर्वी चित्रनगरी परिसरात आले होते. तेव्हा रोहित आणि डेंझिल यांनी तुम्हाला चित्रनगरी दाखवतो त्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये खर्च येईल असे रहमान यांना सांगितले.

त्यानंतर त्यांनी आणखी दोन परदेशी नागरिकांना रिक्षात बसवले. रहमान आणि दोन परदेशी नागरिकांना फक्त जंगलात फिरून आणले. तेव्हा रहमान यांनी चित्रनगरी कुठे आहे, अशी विचारणा केली तेव्हा त्यांना आणखी दीड हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. फसवणूकीप्रकरणी रहमान आणि दोन परदेशी नागरिकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली.