VIDEO: निर्जन रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । दिल्ली

दिल्लीतील दयालपूर भागात चाकूचा धाक दाखवून एका महिलेला लुटण्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पीडित महिला अपल्या 2 ते 3 वर्षांच्या मुलासह रात्रीच्या सुमारास रस्त्याने जात असताना दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी वाटेत तिला अडवून तिचे दागिने हिसकावून घेतले. त्यामुळे दिल्लीत कायदा व सुव्यवस्था आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलेचे दागिने लुटतानाचा संपूर्ण घटनाक्रम तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दयालपुरमध्ये पीडित महिला रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला चालत्या गाडीवरून महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरल्याने आणि निर्जन रस्त्यावर एकटी महिला पाहून त्यांनी गाडी थांबवली व चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील दागिने हिसकावले. आपल्या व मुलाच्या जिवाच्या भीतीने भयभीत झालेल्या पीडितेने प्रतिकार करण्याचे टाळले. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरलेले दागिने वसूल केले आहेत.