
वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना विलेपार्ले आणि मालवणी परिसरात घडली. शाहरुख शेख आणि ओमप्रकाश यादव अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मालवणी आणि वाकोला पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.
पहिली घटना विलेपार्ले परिसरात घडली. शनिवारी यादव हे विलेपार्ले येथे एका श्रद्धानंद रोडवरून डॉक्टरकडे जात असताना टेम्पोने धडक दिली. यादव यांना टेम्पोचालकाने काही अंतर फरफटत नेले. दुसऱया घटनेत मालवणीत राहणारा शाहरुख मोटारसायकलने जात असताना त्याला ट्रकने धडक दिली. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.




























































