रिक्षावाल्याचे छाटलेले मुंडके घेऊन आरोपी पोलीस स्थानकात हजर

100

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणा जिल्ह्यात दोन भावांनी एका रिक्षावाल्याचा खून करून त्याचे मुंडके छाटले. ते छाटलेले मुंडके घेऊन दोघेही पोलीस स्थानकात हजर झाले आणि आपला गुन्हा कबुल केला. यावर पोलीसही अवाक झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद इरफान आणि मोहम्मद घौसे या दोघांना एक बहीण होती. दोघे भाऊ नालागोंडा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांची बहीण विधवा होती. तेव्हा रिक्षावाला सद्दामने तिला हैदराबादमध्ये आणले. नंतर 2017 साली तिचा संशयास्पद मृत्यू झाला.

सद्दामनेच आपल्या बहीणीचा खून केला असा संशय दोघा भावांना होता. त्याचाच बदला म्हणून दोघांनी सद्दामचा काटा काढला. त्याचे शिर उडवले आणि ते शिर घेऊन पोलीस स्थानकात हजर होऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या