
गुजरात येथील अहमदाबाद पोलिसांनी पंजाबमधील दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे चोर पकडल्यानंतर त्यांच्या चोरीच्या आधुनिक पद्धतीने पोलीसही चाट पडले आहेत. सुमारे 10 लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
या चोरांपैकी एक जण सराईत गुन्हेगार आहे. त्यांनी अहमदाबाद येथील अमराईवाडी येथे एटीएम फोडण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. या चोरीचा माग काढताना पोलिसांना समजलं की, दोन्ही चोर चंदिगढ येथून फ्लाईट पकडून अहमदाबाद येथे आले. तेथील एका हॉटेलमध्ये नकली आधार कार्ड दाखवून खोली बुक केली. एका ऑनलाईन मार्केटिंग साईटवरून एक बाईक, गॅस कटर आणि ऑक्सिजन सिलिंडर मागवला.
त्यानंतर त्यांनी गुगल मॅपमध्ये चोरी करण्याची जागा शोधली. त्यांना त्यावर अमराईवाडी येथील एटीएम शोधलं. तिथे त्यांनी गॅसकटरने एटीएम मशीन 10 लाख 72 हजार रुपये लंपास केले. चोरी करून ते हॉटेलवर परत गेले. त्यांनी आपलं सामान बांधलं आणि अहमदाबाद ते दिल्ली फ्लाईट पकडली. पण, पोलिसांनी अमरजित याच्या सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याचा माग काढून तो आणि त्याचा साथीदार यांना अटक केली.

























































