
सामना प्रतिनिधी । कुडाळ
वादळी वा-यासह कोसळलेल्या पावसाने डिगस येथे दोन घरांवर माडाची झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे.
डिगस राणेवाडी – रूमडगाळू येथील प्रतिभा भांबाळे यांच्या घरावर सोमवारी रात्री माड पडून नुकसान झाले. सुदैवाने भांबाळे कुटूंबियांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. तर मंगळवारी गावठणवाडी येथे सावंत कुटूंबियांच्या सार्वजनिक जुन्या घरावर माड पडून नुकसान झाले. ग्रा.पं.प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.































































