बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव बसचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. गोविंद गंगाधर गोनारे (31, रा. मांजरी बुद्रुक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप नाईक (35, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास गोंविद हे न्यायालयातील काम उरकून घराकडे चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या बसचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडलेले गोविंद गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तपास करीत आहेत.