EXCLUSIVE PHOTO-शबरीमला मंदिरात दोन महिलांचा प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोची

दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केला असून त्यांनी दावा केला आहे की आपण गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलंय. पहाटे चारच्या सुमारास या महिलांनी दर्शन घेतलं असल्याचं सांगितलं जातंय. या महिलांची ओळख अजून पटू शकलेली नाही मात्र त्यांची वयं ही पस्तिशी किंवा चाळिशीच्या आसपास असावीत असं सांगितलं जातंय.

पोलिसांच्या गराड्यामध्ये या महिलांनी गुपचूप पद्धतीने मंदिरात प्रवेश केला. नवीन वर्षानिमित्त शबरीमला मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या बरीच मोठी आहे. या गर्दीमध्ये मिसळलेल्या या महिलांना कोणी ओळखू शकलं नाही, त्यामुळे त्या सहजपणे दर्शन घेऊ शकल्या असं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण काळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेल्या या महिलांनी नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा असा स्पष्ट आदेश दिला होता. हा आदेश दिल्यानंतर मंदिरात प्रवेश करणाऱ्या या पहिल्या महिला आहेत.