
19 वर्षांखालील युवतींच्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या युवतींनी इंग्लंडचा पराभव करत आपले पहिले वाहिले जगज्जेतेपद जिंकले आहे. सात गडी राखत टीम इंडियाने हा सामना जिंकला.
As comprehensive a win as you’ll see in the finals of a tournament!
India have raced to a title win at the Women’s #U19T20WorldCup pic.twitter.com/P66Q3p7ovx
— ICC (@ICC) January 29, 2023
सेनविस पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्मा हिने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. हिंदुस्थानी गोलंदाजांच्या अचूक माऱयापुढे इंग्लंडचा डाव 17 व्या षटकातच आटपला. इंग्लंडने अवघ्या 68 धावा केल्या.
……..!
Meet the winners of the inaugural #U19T20WorldCup
INDIA #TeamIndia pic.twitter.com/ljtScy6MXb
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023

























































