इंडियन कंपनीचा धमाका, 40 इंचाचा सर्वात स्वस्त LED टीव्ही केला लॉन्च

Ubon कंपनीने 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही (LED TV) लॉन्च केला आहे.  यात फुल एचडी रेडी डिस्प्ले, 16:9 स्क्रीन रेशीयो आणि 24 व्हाटचा दमदार स्पीकर देण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहीमे अंतर्गत हा टीव्ही तयार करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने 40 इंचाच्या एलईडी टिव्हीत 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज दिली आहे. यात युझरला दोन HDMI पोर्ट आणि हेडफोन कनेक्टर मिळते. या एलईडी टीव्हीचा रिफ्रेश रेट 50 हर्ट्स असून टीव्ही पाहताना वास्तविक प्रतिमांचा भास होतो, असा दावाही कंपनीने केला आहे.

हा टीव्ही लॉन्च करताना UBON चे मॅनेजिंग डायरेक्टर मनदीप अरोरा म्हणाले की, फेस्टिव्ह सिझनपूर्वी कंपनीने आपला बहुप्रतिक्षित 40 इंचाचा एलईडी टीव्ही बाजारात उतरवला आहे. याची किंमतही कमी असून लोकांना याचे फीचर्स नक्की आवडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किंमत

UBON च्या या नव्या एलईडी टीव्हीची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. देशभरात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हा टीव्ही खरेदी करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या