ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनला कोरोना व्हायरसची लागण

858

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. जॉनसन यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. काही दिवसांपूर्वी बोरिस यांनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता त्यांना देखील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

ब्रिटनच्या शाही घराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. आता खुद्द देशाच्या पंतप्रधानांनाच कोरोना झाल्याने समोर आल्याने तेथील जनतेला धक्का बसला आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. देशात आणिबाणीची स्थिती असताना दोन मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या