
सामना ऑनलाईन । लखनौ
भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील उमेदवार साक्षी महाराज यांचा सामना यंदा दोन महिलांशी होणार आहे. विद्यमान खासदार साक्षी महाराज यांच्याविरोधात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन महिला साक्षी महाराजांसमोर आव्हान उभे करणार आहेत.
Lok Sabha 2019 तिकीट द्या अन्यथा… भाजप खासदार साक्षी महाराजांची स्वपक्षालाच धमकी
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली असून सर्वत्र प्रचाराला वेग आला आहे. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये यंदा भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून उन्नाव लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात होते. परंतु काळानुरुप ही जागा भाजपच्या खात्यात गेली. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार साक्षी महाराज यांचा तुंबळ मतांनी विजय मिळवला होता. यंदा त्यांच्या समोर काँग्रेसच्या अनू टंडन आणि सपाच्या पूजा पाल यांचे आव्हान असणार आहे.
सपाच्या उमेदवार पूजा पाल या इलाहाबाद येथून बसपाच्या तिकिटावर 2007 ला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. गेल्या वर्षी त्यांना बसपाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर त्य़ांनी सपामध्ये प्रवेश केला आणि त्यांना यंदा उन्नावमधून उमदेवारी देण्यात आली आहे.
उन्नाव मतदारसंघातील मतदारांची संख्या 31 लाख 8 हजाराच्या आसपास आहे. 2014 ला येथे साक्षी महाराज यांना 5 लाख 18 हजार 834 मतं मिळाली होती. साक्षी महाराज यांनी जवळपास 3 लाख 10 हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु यंदा त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

























































