इंग्रजीच्या शिक्षिकेला एबीसीडीही आले नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी केले तात्काळ निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे नुकतेच समोर आले आहे. येथील उन्नाव जिल्ह्यात एका सरकारी शाळेत पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिकेला इंग्रजी पुस्तकातील एक पॅराग्राफ वाचण्यास सांगितले. पण शिक्षिकेला एक शब्दही धड वाचता न आल्याने संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिला तत्काळ निलंबित करण्याचा आदेश दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये जिल्हाधिकारी एका वर्गात विद्यार्थ्याच्या बाजुला बसल्याचे दिसत आहे. त्याचेवळी जिल्हाधिकारी बाजुला बसलेल्या एका विद्यार्थीनीच्या इंग्रजी पुस्तकातील एक पॅराग्राफ वाचा असे शिक्षिकेला सांगतात. पण इंग्रजीची शिक्षिका असलेल्या या शिक्षिकेला एक अक्षरही वाचता येत नाही. हे बघून संतप्त झालेले जिल्हाधिकारी तिला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देतात. यामुळे हादरलेली शिक्षिका त्यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. पण मी तुम्हाला फक्त एक पॅराग्राफ वाचण्यास सांगितले होता. त्याचा अनुवाद करायला नाही. तुम्ही बीए पास आहात. बीटीसीपण तुम्ही केली आहे. असे सांगत जिल्हाधिकारी तिला समज देताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण गंमत म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे हे काही पहीले उदाहरण नाही. तर याआधीही अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे.