बहिणीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत आढळलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील चिलुआताल भागात प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या मुलीला घरातल्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी जीवाच्या भीतीने तिला तिथेच सोडून पळालेल्या प्रियकराची मुलीच्या भावाने कुऱ्हाडीने खांडोळी केल्याची भयंकर घटना घडली आहे. सूरजपाल सिंह असे मृत तरुणाचे नाव आहे.

सूरजपाल व गावातील एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र दोघांच्याही घरच्यांचा त्यास विरोध होता. यावरून दोघांच्याही घरात सतत वाद व्हायचा. पण सूरजपाल व तरुणी त्याकडे सतत दुर्लक्ष करायचे. शनिवारी तरुणी घरात एकटी असताना सूरजपाल तिला भेटावयास आला. दोघेही आपत्तीजनक स्थितीत असतानाच अचानक मुलीचा भावाने घरात प्रवेश केला. बहिणीला अशा स्थितीत बघुन त्याचा रागाचा पारा चढला व त्याने बहिणीला मारहाण करण्यास सुरूवात केली. याचाच गैरफायदा घेत सूरजपालने तिथून पळ काढला. दरम्यान मारहाणीत तरुणी अर्धमेली होताच भावाने सूरजपालचा पाठलाग करून त्याला रस्त्यातच गाठले. ते बघताच सूरजपालने जवळच्या पिस्तुलातून तरुणावर गोळी झाडली. त्यानंतर तरुणीच्या घरातले घटनास्थळी पोहचले. याचदरम्यान जवळ पडलेल्या कुऱ्हाडीने तरुणीच्या भावाने तिच्या प्रियकराच्या मानेवर व छातीवर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तरुणीच्या भावाला पकडा व त्याच्यार कडक कारवाई करण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.