
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे हिंदुस्थानमध्ये 26 जानेवारी रोजी साजरा होणाऱया प्रजासत्ताक दिनासाठी हिंदुस्थानात येऊ शकणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांना जी-20 शिखर बैठकीच्या द्विपक्षीय चर्चेवेळी हिंदुस्थानात प्रजासत्ताकदिनी येण्यासाठी निमंत्रण दिले होते, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे 26 जानेवारीला हिंदुस्थानात येणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. 26 जानेवारीच्या जवळपास हिंदुस्थानात क्वॉड समिटचे आयोजनसुद्धा करण्यात येणार आहे, परंतु हिंदुस्थानकडून क्वॉड समिटची नवीन तारीख ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
























































