किचनसाठी उपयुक्त टिप्स

74

 

– कापलेल्या सफरचंदाच्या फोडींमध्ये लिंबूरसाचे काही थेंब टाकल्यास ते काळे पडत नाही.

– मिरचीची देठे काढून फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या बरेच दिवस टिकतात.

– नूडल्स उकळल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकल्यास नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत.

– लिंबू गरम पाण्यात काही वेळ ठेवा. नंतर कापा. यामुळे कापलेल्या लिंबाच्या फोडीतून जास्त रस निघेल.

– लसूण मंद आचेवर हलकेसे गरम केल्यावर तो सोलणे सोपे जाते.

– मिरच्या ठेवलेल्या डब्यात थोडीशी हिंग पावडर घालून ठेवा. यामुळे मिरच्या जास्त दिवस ताज्या राहतील.

– स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडला असल्यास त्यावर ब्लिच पावडर टाका. त्यानंतर ब्रशने साफ करा. चिकटपणा सहज निघेल.

– साखरेच्या डब्यात 6-7 लवंगा ठेवा. साखरेला मुंग्या येणार नाहीत.

– कणिक मळताना त्यामध्ये थोडेस दूध घाला. पोळ्या हलक्या आणि स्वादिष्ट होतील.

– गरम पाण्यात एक कप व्हिनेगर घालून फरशी साफ करा. फरशी चकाकदार आणि स्वच्छ होईल.

– वरण शिजवताना त्यात चिमूटभर हळद आणि बदाम तेलाचे काही थेंब घाला. वरण लवकर शिजून चविष्ट होईल.

– तांदूळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तेल आणि लिंबूरसाचे काही थेंब घाला. शिजल्यानंतर भात मोकळा होईल.

– कोणतीही पालेभाजी शिजवण्यापूर्वी त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस घातल्याने पालेभाज्या हिरव्यागार राहातात.

– साबूदाणा भिजवण्यापूर्वी भाजला तर खिचडी मऊ आणि मोकळी होते

आपली प्रतिक्रिया द्या