केंद्र सरकारचा उत्तर प्रदेशमधील मदरशांना धक्का, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केली रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमधील मदरशात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मदरशांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारी 1000 रुपयांची शिष्य़वृत्ती आता बंद होणार आहे.

गेल्या वर्षी 16 हजार 558 मदरशांमधील पहिली ते आठवीच्या सहा लाख विद्यार्थ्यांना सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची यादी मागवली होती. मात्र त्यानंतर आता त्यानंतर आता केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती रद्द केली आहे.