
Uttarakhand Polls 2022: उत्तराखंड विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि त्यांच्या पत्नीवर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेला स्कार्फ घालून मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. धामी आणि भाजपच्या उत्तराखंड युनिटसह सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री भाजपचे चिन्ह आणि रंगीत स्कार्फ घातलेले दिसतात. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार मतदान केंद्राच्या आजूबाजूला पोस्टर, झेंडे, बोधचिन्ह किंवा इतर कोणतेही साहित्य प्रदर्शित केले जाणार नाही.
धामी यांची पत्नी गीता सकाळीच मतदानावेळी भाजपचा स्कार्फ घालून मतदान केंद्रात प्रचार करताना दिसली. भाजपचे इतर अनेक कार्यकर्तेही हा स्कार्फ घातलेले दिसले पण सुरक्षा कर्मचारी आणि मतदान अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसले नाहीत. याबाबत एनडीटीव्हीने विचारलेल्या प्रश्नावर धामीच्या पत्नीने सांगितले की, ‘हा प्रचार नाही. मी हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानत नाही. आम्ही प्रत्येक निवडणुकीत बूथवर जातो, त्यात गैर काहीच नाही. लोकांनी आधीच आपले मत बनवले आहे, पक्ष जिंकत आहे.’
खटीमा में ये क्या हो रहा है?@pushkardhami चुनाव प्रचार खत्म होने के बाद खुलेआम पैसे बाँट रहे हैं।
खटीमा से आम आदमी पार्टी के प्रत्याशी @sskaleraap ने खुद धामी को रंगे हाथों पकड़ा तो धामी ने कैमेरा बंद कराने की कोशिश की।@ECISVEEP व @UttarakhandCEO जल्द इसका संज्ञान लें। pic.twitter.com/oLpuKV7UkX
— Aam Aadmi Party Uttarakhand (@AAPUttarakhand) February 13, 2022
धामी यांच्यावर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचे आरोप तेव्हा समोर आले जेव्हा आम आदमी पक्षाच्या उत्तराखंड युनिटने त्यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. आता व्हायरल झालेला व्हिडीओ सामायिक करताना, AAP च्या राज्य युनिटने आरोप केला आहे की त्यांचे खतिमा जागेचे उमेदवार एस कालेन यांनी “मुख्यमंत्र्यांना रंगेहाथ पकडले” आणि राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. धामी यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. राज्यातील सर्व 70 जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सीएम धामी यांच्यासह प्रमुख उमेदवारांमध्ये सतपाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते हरीश रावत, गणेश घोडियाल आणि धनसिंग रावत यांचा समावेश आहे.

























































