
लवकरच अवघे जग ‘लस द्या बाळा, कोरोना टाळा’चा नारा देणार आहे. कोरोना लढय़ात अमेरिकेने मोठी खूशखबर दिली आहे. ‘फायजर’ औषध कंपनीने 12 वर्षांखालील मुलांसाठी कोरोना लस तयार करून तिची चाचणीही सुरू केली आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही लस बाजारात येईल. वृद्धांपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम लहानग्यांपर्यंत आणण्यासाठी अमेरिकेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यांना दोनऐवजी तीन डोस दिले जातील. मॉडर्ना पंपनीनेही सहा महिन्यांपर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी चाचणी सुरू केली आहे.

























































