
सामना प्रतिनिधी । निलंगा
तालूक्यातील होसूर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत बोगस कामाविरोधात ५ जुलै २०१८ रोजी रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडे वाल्मिकी आदिवासी युवा संघटनेकडून देण्यात आले आहे.
निलंगा तालूक्यातील होसूर येथे सामाजिक वनीकरण विभागांतर्गत २०१६ – १७ मध्ये पाण्याची टाकी व भांडारगृहाचे कामाची मंजुरी झाली होती. हे काम मार्च २०१७ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. पण हे काम पूर्ण करण्याआधीच संबंधित अधिकाऱ्याने या कामाचे बिल (पैसे) ठेकेदारास दिलेले आहे. ठेकेदाराने शासनाची फसवणूक केल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे २१ मे रोजी केली होती. पण काम अपूर्ण असताना ठेकेदारास बिल दिले गेले असुनही संबंधित कर्मचारी, अधिकारी व ठेकेदार कोणावरही कार्यवाही होत नसल्याचे पाहून ५ जुलै रोजी लातूर जवळ तावरजा नदी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन अनिल कोळी यांनी वाल्मिकी युवा संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.




























































