मी मुख्यमंत्र्यांना इतकेच सांगतो, कोकणची वाट लावू नका! प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाला 70 टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचा दावा सरकार करीत आहे. मग आंदोलनकर्त्यांवर लाठीमार का केला? मी मुख्यमंत्र्यांना इतकेच सांगतो की, कोकणची वाट लावू नका, अशा शब्दांत वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले आहे. केंद्रातून फोन आला की सत्ताधारी आपली भूमिका बदलतात, असा आरोपही त्यांनी केला.

बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या महाधम्म मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशातील अर्धे मंत्री हे अर्धशिक्षित आहेत असे मी मानतो. कारण ते शिक्षित असते तर कोकणात रिफायनरी प्रकल्प आणलाच नसता. रिफायनरी प्रकल्पाविरोधात बारसू अजूनही धुमसत असून राज्य सरकारचे पोलीस मात्र आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करीत आहेत. ही दडपशाही फार काळ टिकणार नाही. सरकारला याचा जाब द्यावाच लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले.