मिंध्यांच्या सभेकडे वसमतकरांची पाठ

हिंगोली मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या मिंध्यांना वसमतकरांनी चांगलाच हिसका दाखवला. वसमतकरांनी सभेकडे पाठ फिरवल्याने महायुतीच्या पदाधिकाऱयांना लोक गोळा करण्यासाठी वणवण करावी लागली. लोकच नसल्याने मिंधे तब्बल दोन तास ताटकळले. शेवटी मिंध्यांना अजितदादा गटाचे आमदार राजू नवघरे यांच्या घरी पाहुणचारासाठी जावे लागले.

वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांच्या प्रचारासाठी आज सकाळी 10 वाजता मिंध्यांची सभा ठेवण्यात आली होती. सभेसाठी मिंध्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. परंतु सभास्थळी कोणीच नव्हते. त्यामुळे मिंधे आमदार राजू नवघरे यांच्या घरी चहापानासाठी गेले.