
कोरोनाच्या सावटानंतर आता हळूहळू बॉलिवूड पूर्वपदावर येताना दिसत आहे. अनेक रखडलेले चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सूर्यवंशी या चित्रपटाने त्याची सुरुवात केली आहे.
या यादीत अजून एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव गोविंदा नाम मेरा असं असणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे.
आतापर्यंत गंभीर भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या विकीची ही एक हलकीफुलकी भूमिका असेल. या चित्रपटात विकीसह भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात विकी हा गोविंदा वाघमारे नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. भूमी या गोविंदाची पत्नी तर कियारा गोविंदाच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकेल.
Meet Govinda Waghmare! Heart of gold and dance moves are bold!
Presenting #GovindaNaamMera, where there will be unlimited laughter, confusion and chaos! In cinemas on 10th June, 2022.@apoorvamehta18 @AndhareAjit @vickykaushal09 @bhumipednekar @advani_kiara #ShashankKhaitan pic.twitter.com/gGCAjLsW7S
— Karan Johar (@karanjohar) November 12, 2021
या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून शशांक खेतान या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढल्या वर्षी जून महिन्यात असणार आहे.
विकी कौशलबाबत बोलायचं झालं तर तो सध्या सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटात झळकणार आहे. भूमी पेडणेकर बधाई दोमध्ये राजकुमार रावसोबत दिसेल. तर कियाराच्या खिशात भूलभुलैय्या 2 आणि जुग जुग जियो असे दोन चित्रपट आहेत.




























































