विमानात भीक मागताना भिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

85

सामना ऑनलाईन, मुंबई

बस आणि ट्रेनच्या प्रवासात आपण भिकाऱ्यांना भीक मागताना बघितले आहे. मात्र विमानात कधी भिकारी भीक मागताना बघितलाय का.. नाही ना…हे वास्तवात घडलं आहे, कतारमध्ये. कतार एअरवेजच्या विमानात एका भिकाऱ्याने विमानात चक्क भीक मागितली आणि त्याला ती मिळालीही.

विमानातील भिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. दोहाहून इराणमधील शिराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने निघालेल्या विमानात हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.  विमानाच्या पॅसेजमध्ये उभे राहून मळके कपडे घातलेला एक मध्यमवयीन पुरुष हातात पाऊच घेऊन भीक मागताना व्हिडीओत दिसत आहे. एक प्रवासी त्याला भीक म्हणून नोट देतानाही दिसत आहे. भिकाऱ्याला विमानात बघून प्रवाशांसह केबिन क्रूदेखील थक्क झाले. केबिन क्रू त्याच्याशी वाद घालताना तर हवाई सुंदरी त्याला बसायला सांगतानाही व्हिडीओ दिसत आहे. भीक मागणारी व्यक्ती विमानात कशी काय चढली, तिने तिकीट कसे काय बुक केले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विमानातील एका प्रवाशाने हा व्हिडीओ सोशल नेटवार्ंकग साईटवर अपलोड केल्यानंतर तो जगभर व्हायरल झाला आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या