तसा विचार केला असता तर मी घरी बसलो असतो, कोहलीचा गौतम गंभीरला टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गौतम गंभीर याने काही दिवसांपूर्वी आयपीएल जिंकण्यावरून विराट कोहली व महेंद्र सिंह धोनी यांची तुलना केली होती. त्याच्या या तुलनेत त्याने विराट कोहलीला कमीपण दाखवला होता. त्या टोल्याला आज विराट कोहलीने गंभीरचे नाव न घेता टोला लगावला आहे. ‘जर मी बाहेरच्या लोकांसारखा विचार केला तर मला देखील घरी बसावे लागेल’,असा टोला त्याने गंभीरला लगावला आहे.

गौतम गंभीर याने आयपीएलचे सिझन जिंकण्यावरून महेंद्र सिंह धोनी व विराट कोहलीची तुलना केली होती. ‘आताच्या हिंदुस्थानच्या कर्णधाराने एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही तर त्याच्या आधीच्या कर्णधाराने आयपीएलचे तीन सिझन जिंकले. उपकर्णधाराने देखील तीन आयपीएलचे सिझन जिंकले आहेत’,असे वक्तव्य गंभीर याने केले होते.

त्याविषयी बोलताना कोहलीने गंभीरला टोला लगावला आहे. ‘मला आयपीएल जिंकायचे आहे पण लोक माझ्याबाबत काय विचार करतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मी चांगला खेळायचा प्रयत्न करतो. मी सर्वच स्पर्धा जिंकायसाठीच खेळत असतो पण कधीतरी ते होत नाही. बाहेरची लोकं काय विचार करतात याचा जर मी विचार केला तर मी पाच सामने देखील टीकू शकणार नाही. मला देखील घरी बसावे लागेल, असा टोला कोहलीने लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या