
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये गुरुवारी हिंदुस्थान आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली. तसेच दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला टीम इंडियाचा गब्बर खेळाडू शिखर धवन सेमिफायनलपूर्वी संघात परत येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
World cup 2019 सामना रद्द झाल्यास तिकिटाचे किती पैसे परत मिळतात?
शिखर धवनच्या दुखापतीबाबत बोलताना विराट म्हणाला की, ‘धवनच्या बोटावर काही आठवडे प्लास्टर असणार आहे आणि त्यानंतर आम्ही परिस्थितीची चाचपणी करू की तो बरा झाला किंवा नाही. रॉबिन राऊंड लिगच्या अंतिम लढतींसाठी आणि सेफिफायनलसाठी तो उपलब्ध असेल अशी आम्हाला आशा आहे.’
वर्ल्डकपचा अंतिम सामना ‘या’ दोन संघात होईल, सुंदर पिचाई यांचे भाकीत
विराटसह गोलंदाजी प्रशिक्षकांनी देखील धवनच्या दुखापतीबाबत सांगितले की, आम्ही सुरुवातीला त्याचा हलक्या चेंडूने सराव घेऊ आणि त्यानंतर अस्सल लढतीत वापरणाऱ्या चेंडूने सराव घेऊ. त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.


























































