व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा होणार मुख्य प्रशिक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लक्ष्मण हे हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. या बातमीमुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पदावरून दूर केले जाणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडू लागला आहे, मात्र तसे काही नाही. गौतम गंभीर भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. बीसीसीआयच्या आशियाई खेळांसाठी लक्ष्मण यांना भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या तयारीत आहे.