कर्णधार मला नोकरा सारखा वागवायचा, मसाज करायला लावायचा; वसिम अक्रमचा गंभीर आरोप

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वसीम अक्रम हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. वसीमने त्याची कारकिर्द चांगलीच गाजवली. त्याच्या मैदानावरील आयुष्यापासून त्याचे खाजगी आयुष्य देखील कायम चर्चेत राहिले आहे. नुकतच वसीम अक्रम याचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे. त्या आत्मचरित्रात त्याने त्यांच्याच संघाच्या कर्णधारावर गंभीर आरोप केले आहेत.

वसीमने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकवर आरोप केले आहे. सलीमने पाकिस्तानी संधात 1982ला पदार्पण केलं व वसीमने 1984 ला. वसीम अक्रमच्या कारकिर्दीची सुरुवात ही सलीम मलिक कर्णधार असताना झाली आहे. वसीमने ‘सुलतान : दे मेमोर’ या आत्मचरित्रातून गंभीर आरोप केले आहेत.

”तो माझा सिनियर होता त्याचा कायम फायदा घ्यायचा. खूप स्वार्थी होता तो. मला नोकरासारखं वागवायचा. मला त्याने त्याचे शूज आणि कपडे धुवायला लावले. मसाज करायला लावले आहे” असा गंभीर आरोप वसीमने त्याच्या पुस्तकातून केला आहे.