
नगर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱया 41 जलस्त्रोतांचे जलनमुने दूषित असल्याचा अहवाल वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जलशुद्धीकरणाबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.
नगर जिह्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. बहुतांश ठिकाणी सार्वजनिक विहिरींचाही जलस्त्र्ााsत उपलब्ध आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे, हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तसेच अशुद्ध पाणी पिल्यास आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडे दूषित जलस्त्र्ााsतांच्या मासिक अहवालांची नोंद ठेवली जाते. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने 1 एप्रिल ते नोव्हेंबरअखेर 12 हजार 226 पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यात 533 ठिकाणचे नमुने दूषित आढळले. नोव्हेंबर महिन्यात 1 हजार 596 नमुने तपासल्यानंतर 41 ठिकाणी पाणी दूषित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. ज्या ठिकाणी नमुने दूषित आहेत, त्याठिकाणी जलशुद्धीकरण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
जलशुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा (टीसीएल) वापर केला जातो. टाक्यांमध्ये साठविलेल्या या पाण्यात टीसीएल पावडर टाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. स्थानिक पातळीवर नेमण्यात आलेल्या जलसुरक्षकांमार्फत पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. जलशुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱया टीसीएल पावडरची गुणवत्ताही तपासली जाते.
जलशुद्धीकरणाची पावडर निकृष्ट
- जलशुद्धीकरणासाठी पाण्याच्या टाक्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. या पावडरचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात आले. अहवालानुसार महिनाभरात 16 गावांतील पावडर नमुने निकृष्ट आढळून आले आहेत. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत हा आकडा 102 वर पोहोचला आहे. त्यामुळे गुणवत्ता टिकविण्याचे आव्हान आहे.
दूषित पाण्याची गावे
- गुहिरे, कातळपूर, मालेगाव, तेरुंगण (अकोले), कारवाडी, शिगानापूर, मढू बु. (कर्जत), धोत्रे बु., ढोकी, रुईछत्तीशी, नारायणगव्हाण, जातेगाव, गटेवाडी, म्हसोबाझाप (पाथर्डी), शंकरवाडी, शेकडे, खिर्डी, घाटशिरस, कोल्हार, खाडगाव, जावळवाडी, अल्हनवाडी, निपाणी (पाथर्डी), हासनपूर, पाथरे बु. (राहाता), कणगर, चांदेगाव, निंभेरे (राहुरी), वनकुटे, सावरगाव घुले, वरुडीपठार (संगमनेर).


























































