
सामना प्रतिनिधी । नांदेड
मराठवाडा-विदर्भ सिमेवरील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील पैनगंगा नदीवरील मनमोहक सहस्त्रकुंड धबधबा नुकत्याच झालेल्या पावसामुळे भरुन वाहत आहे. अन् शेकडो पर्यटकांचे आकर्षक ठरलेला हा धबधबा पहाण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे.
वर्षा पर्यटनाचा आनंद घेणाऱ्यांसाठी नांदेड ते किनवट मार्गावर असलेल्या इस्लापूर जवळील सहस्त्र कुंड धबधबा हा पर्वणीच ठरला असून हजारो पर्यटक येथे येत आहेत. पोलिस अधीक्षक नांदेड यांनी येथे पर्यटकांना सेल्फीसाठी बंदी घातली आहे.






























































