7 महिलांवर लैंगिक अत्याचार करून खून करणार्‍या सिरीयल किलरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी एका विकृत सीरीयल किलरला अटक केली आहे. या गुन्हेगाराने 7 महिलांवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचे नाव कमरुझम्मान सरकार असून त्याचे वय 42 आहे. पोलिसांनी त्याला एका खुन प्रकरणी अटक केली होती. तेव्हा त्याने अजून सहा खून केल्याचे कबुल केले.

आरोपी सरकारने ऑक्टोबर 2018 ते मे 2019 दरम्याने हे गुन्हे केले आहेत. बहुतांश महिला या मध्यम वयाच्या आहेत. जेव्हा घरी कोणी नसायचे तेव्हा वीज मीटर तपासण्याच्या बहाण्याने तो घरात घुसत. आणि एका शस्त्राने त्यांना तो जखमी करत. नंतर आरोपी महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा खून करत असत.

एका सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा माग काढला. त्याला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला तेव्हा आपण आधीही असे कृत्य केल्याचे त्याने कबुल केले. त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपीची मानसिक स्थिती समजण्यासाठी पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली आहे.