ममता बॅनर्जींना 24 तास प्रचारबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेस नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे. भडकावू भाषण दिल्याच्या आरोपावरून सोमवारी रात्री 8 वाजताच ही बंदी लागू करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी ही कारवाई केली.

निवडणूक आयोगाच्या कारवाईवर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींनी जोरदार निशाणा साधला. हा लोकशाहीतील काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली. तसेच ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीविरोधी व असंवैधानिक असल्याचे ट्विट केले. त्या मंगळवारी दुपारी 12 वाजता कोलकात्यात धरणे आंदोलन सुरू करणार आहेत.