प. बंगाल महापालिका निवडणुकीचे निकाल – सर्व जागांवर तृणमूल पुढे, भाजप पिछाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसनसोल, विधाननगर, चंदननगर, सिलीगुडी महानगरपालिका निवडणूकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमधील आसनसोल महानगरपालिका, विधाननगर महानगरपालिका, चंदननगर महानगरपालिका आणि सिलीगुडी महानगरपालिका – या चार महापालिकांच्या निवडणुका शनिवारी पार पडल्या. आसनसोल, विधाननगर, चंदननगर, सिलीगुडी महानगरपालिकेतील मतदानाची आज मोजणी होत आहे.

सिलीगुडी, विधाननगर, आसनसोल, चंदनगोर येथे तृणमूलने आघाडी घेतली

बंगाल महानगरपालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सिलीगुडी, विधाननगर, चंदनगोर आणि आसनसोल महापालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये आघाडी मिळवली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) या सर्व महापालिकांमध्ये पिछाडीवर आहे.