
कोकणात गणपती उत्सवाला जाण्यासाठी होणारी गर्दी पाहून पश्चिम रेल्वेने सप्टेंबर महिन्यात दहा ट्रेनच्या 42 फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन पश्चिम रेल्वेच्या वांद्रे तसेच मुंबई सेंट्रल अशा मोजक्या स्थानकांतून मडगाव, सुरतकल आणि कुडाळदरम्यान चालविण्यात येत आहेत. आता प्रवाशांना अधिक दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाच ट्रेनना अधिक डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
– ट्रेन क्र.09185/86 मुंबई सेंट्रल-मडगाव स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रलहून 10 आणि 17 सप्टेंबर रोजी तसेच मडगावहून 11 आणि 18 सप्टेंबर रोजी दोन अतिरिक्त स्लीपर क्लास कोचसह धावणार आहे.
– ट्रेन क्र. 09187/88 वांद्रे टर्मिनस-मडगाव एसी स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनसहून 5, 12 आणि 19सप्टेंबर रोजी तसेच मडगावहून 6, 13 आणि 20 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त एसी 3-टियर तसेच एक अतिरिक्त एसी चेअर कार कोचसह धावणार आहे.
– ट्रेन क्र. 09193/94 वांद्रे टर्मिनस-मडगाव एसी स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनसहून 7 सप्टेंबर रोजी तसेच मडगावहून 8 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त एसी 3-टियर आणि एक अतिरिक्त एसी चेअर कार कोचसह चालविण्यात येईल.
z ट्रेन क्र. 09183/84 मुंबई सेंट्रल-सुरतकल स्पेशल ट्रेन मुंबई सेंट्रलहून 8 आणि 15 सप्टेंबर रोजी तसेच सुरतकलहून 9 आणि 16 सप्टेंबर रोजी दोन अतिरिक्त स्लीपर क्लास कोचसह धावेल.
z ट्रेन क्र. 09195/96 उधना-मडगाव स्पेशल ट्रेन उधनाहून 9 सप्टेंबर रोजी तसेच मडगावहून 10 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त एसी 3-टियर, चार स्लीपर क्लास तसेच दोन सेपंड क्लास सीटिंग कोचसह एकूण सात अतिरिक्त कोचेस धावणार आहेत.

























































