
बँकेत चेक जमा केल्यानंतरही क्लिअर न होण्याची काही कारणे असू शकतात. सध्या चेक लवकर क्लिअर होतात. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब होऊ शकतो.
ज्या व्यक्तीने किंवा कंपनीने तुम्हाला चेक दिला आहे, त्यांच्या खात्यात चेकवरील रकमेइतकी शिल्लक नसल्यास चेक बाऊंस होतो. काही वेळेला स्वाक्षरी जुळत नाही.
चेकवर नाव, तारीख किंवा रकमेत कोणतीही खाडाखोड वा ओवरराईटिंग असेल तर चेक फेटाळला जातो. चेकची तीन महिन्यांची मुदत संपल्यावर तो वटत नाही.
तुमचे नेट बँकिंग किंवा पासबुक तपासा, पैसे जमा झाले आहेत का किंवा चेक बाऊंस झाल्याचा मेसेज किंवा शुल्क कापल्याचे दिसून येते का?
चेक न वटल्यास बँक तुम्हाला चेक का नाकारला, याचे कारण सांगणारा ‘रिटर्न मेमो’ आणि मूळ चेक परत पाठवते. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधा.





























































