असं झालं तर… उपकरणांचा वापर नसतानाही वीज बिल जास्त आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातील उपकरणांचा वापर नसतानाही वीज बिल जास्त का येते याचे मुख्य कारण टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, चार्जर, एसी, राऊटर, आरो आणि कॉम्प्युटरसारखी उपकरणे आहेत.

ही सर्व उपकरणे रिमोटने बंद केली तरी प्लगमधून वीज ओढत राहतात. उपकरणे बंद दिसू शकतात, परंतु प्रत्यक्षात ते सतत वीज वापरत आहेत.

यूपी पॉवर कॉर्पोरेशनने एका ट्विटमध्ये स्टॅण्डबाय मोडवर टीव्ही-चार्जरसारखी उपकरणे वीज वापरत असल्याचा इशारा दिला आहे.

स्टॅण्डबाय मोडमध्ये डिव्हाईस कार्य करत नसले तरी ते चालू राहते. उपकरणांचा अनुभव सुरळीत करण्यासाठी त्यामध्ये स्टॅण्डबाय मोड उपलब्ध केले जाते.

वीज बिल कमी करण्यासाठी मेन स्विचमधून बटण बंद करणे हा योग्य पर्याय आहे. थोडी सावधगिरी बाळगल्यास मोठ्या बिलाची समस्या दूर होऊ शकते.