
आफ्रिकन खंडातील केनिया या देशात आढळणाऱ्या जगातील एकमेव पांढऱ्या रंगाच्या मादी जिराफाची आणि पिल्लाची शिकाऱ्यांकडून हत्या करण्यात आली आहे. दुर्मिळ प्राण्यांमध्ये समावेश होणाऱ्या या जिराफांच्या हत्येमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये संताप उसळला आहे. त्यामुळे आता केनियाच्या जंगलामध्ये पांढऱ्या रंगाचा पुरुष जातीचा जिराफ शिल्लक आहे.
केनियामध्ये जिराफांमधील दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या पांढऱ्या रंगाचे तीन जिराफ केनियामध्ये आढळत होते. मात्र, आता यातील दोन जिराफांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकच पांढरा जिराफ केनियाच्या जंगलात आहे. दुर्मिळ असणाऱ्या प्राण्यांमध्ये या पांढऱ्या रंगाच्या जिराफांचा समावेश होतो. केनियामध्ये 2017 मध्ये हे जिराफ आढळले होते. यामध्ये एक, नर, मादी आणि एक लहान जिराफांचा समावेश होता. या तीन जिराफांपैकी मादी आणि पिल्लाची हत्या करण्यात आली आहे.

‘आफ्रिका वाइल्डलाइफ फाउंडेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, मागील 30 वर्षात जिराफांच्या संख्येत 40 टक्के घट झाली आहे. मांस आणि चामड्यासाठी जिराफांची हत्या करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनने दिली आहे. वर्ष 1985 मध्ये जिराफांची संख्या 1 लाख 55 हजार होती. तर, 2015च्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 97 हजार राहिली आहे.
In October 2017 something rare was spotted in Giraffe County, Kenya. One white giraffe & a kid, due to genetic leucism. As rare they were, everybody was in awe.
Yesterday both of the extremely rare creatures were killed by poachers. Short story of wildlife crimes. C- Telegraph. pic.twitter.com/TNvIRARDVv
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) March 11, 2020
‘ल्यूसलिज्म’ नावाच्या अनुवांशिक आजारामुळे…
जिराफ हे पिवळसर रंग, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकाराची आकृती असणारे असतात. मात्र, पांढरे जिराफ वेगळे असतात. ल्यूसलिज्म नावाच्या अनुवांशिक आजारामुळे हे जिराफ पांढरे असतात. या आजारात त्वचा पेशींची पिग्मेंटेशन (त्वचेचा मूळ रंग नसणे) प्रकिया थांबवते. ल्यूलिज्ममध्ये जिराफाच्या डोळ्याजवळ काळा रंग आढळतो. त्यामुळेच या पांढऱ्या जिराफांची गणना दुर्मिळ प्रजातीत होतो.

























































