
सामना प्रतिनिधी । सातारा
सातारा लोकसभेचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. कोरेगावामध्ये एका महाविद्यालयात संवाद साधत असताना कोणी छेड काढत असेल तर मला सांगा त्यावर निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन तरुणींना दिले.
कोरेगामध्ये एका महाविद्यालयात संवाद कार्यक्रमात एका तरुणीने उदयनराजेंना प्रश्न विचारला की, “अनेकवेळा मुलं मुलींची छेड काढतात, त्यामुळे मुलींना त्रास होतो.” यावर उदयनराजे म्हणाले की, “या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे मलाही कळत नाही. परंतु ही बाब नैसर्गिक आहे. त्याचा तुम्हालाही त्रास होईल. परंतु मुलांनी मुलींकडे नाही पहायचं तर मुलांकडे पहायचं का? हा गमतीतला भाग झाला परंतु यात कुठल्याही प्रकारची विकृती असता कामा नये.” असे काही झाले तर मला सांगा. तातडीने त्यावर चर्चा करून, संबंधित मुलाला समजावून प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन उदयनराजेंनी तरुणींना दिले.
























































