महिला सावकाराची दादागिरी, व्याजाने घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून आदिवासी महिलेला मारहाण

व्याजाने दिलेले पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून एका महिला सावकाराने एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे घडली आहे.

नांदगाव येथील प्रिंपाळे गावात घडलेल्या या अमानुष घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

मिळेलेल्या माहितीनुसार नांदगावमधील प्रिंप्राळे येथे एका गरीब दाम्पत्याने संगीता वाघ या महिला सावकाराकडून 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. यातील बरीच रक्कम पीडित कुटुंबाने परत केली होती.

मात्र, परत केलेली रक्कम हे फक्त व्याज असून मूळ किंमत अजून शिल्लक असल्याचा दावा संगीता वाघ या महिलेने केला. त्यानंतर या महिला सावकाराने कर्ज घेतलेली महिला आणि एका पुरुषाला अमानुषपणे मारहाण केली.

आपली प्रतिक्रिया द्या