लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । जालना

पतीपासून वेगळे राहणाऱ्या एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून सतत शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या पंकज खाडे याच्याविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणाची चौकशी करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांढरे यांना १० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी खाडे याने लाचलुचपत विभागामार्फत अटक करविली होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जुना जालना भागात राहणाऱ्या एका महिलेशी पंकज आसाराम खाडे याने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही महिन्यापासून सतत शारीरिक संबंध ठेवून नंतर मात्र सदरील महिला गर्भवती राहिल्याने लग्नास संमती न दिल्याने सदरील पिडीत महिलेने या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रारअर्ज दिल्यानंतर त्या अर्जाची चौकशी करत असतांना या प्रकरणात तडजोडीसाठी ५ लाख रूपये देण्याची मागणी सहायक पोलीस उपनिरीक्षक पांढरे यांनी केली होती. दरम्यान, आरोपी खाडे याने पांढरे यांना १० हजाराची लाच देतांना त्यास लाचलुचपत विभागामार्फत अटक करविली होती. त्यानंतर गुरुवार २२ नोव्हेंबर रोजी सदरील पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून आरोपी पंकज आसाराम खाडे याच्याविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.