बापरे! घटस्फोटासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पिंपरी

बायको हुंडा आणत नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी तिच्या शरिरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आल्याचा भयंकर प्रकार पिंपरीत घडला आहे. पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पडवळ नगर, थेरगाव येथे राहणारा  तिचा पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की तक्रार करणाऱ्या महिलेचं लग्न 2015 साली झालं होतं. लग्न झाल्याच्या काही दिवसांतच नवऱ्याने आणि त्याच्या आवडिलांनी पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली. व्यवसायासाठी या महिलेकडे सासरच्यांनी पैसे मागायला सुरूवात केली. काही पैसै दिल्यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही ज्यामुळे सासरच्या मंडळींनी पीडितेला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. तरीही पैसे मिळत नाही हे कळाल्याने नवऱ्याने महिलेवर घटस्फोटासाठी दबाव टाकायला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी ही महिला आजारी पडली होती. याचा फायदा उचलत सासरच्यांनी सलाईनद्वारे तिच्या शरिरात एचआयव्हीचे विषाणू सोडले. तपासणी केली असता या महिलेला एडसची लागण झाल्याचं सिद्ध झालं आहे. या भयंकर घटनेसाठी जबाबदार नवऱ्याविरूद्ध आणि त्याच्या आईवडिलांविरूद्ध काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.