World Cup 2023 – न्यूझीलंड, बांगलादेशचे सहज विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या 346 धावांच्या आव्हानाचाही न्यूझीलंडने सहजगत्या पाठलाग करत आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात 5 विकेट्स आणि 38 चेंडू राखूनत दणदणीत विजय मिळविला. तसेच बांगलादेशने श्रीलंकेचा 7 विकेट्स आणि 48 चेंडूंनी पराभव केला.

पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या 103, बाबर आझमच्या 80 आणि सऊद शकीलच्या 75 धावांच्या जोरावर 5 बाद 345 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने रचीन रवींद्रच्या 72 चेंडूंतील 97 धावा, केन विल्यमसन (54), डॅरिल मिचेल (59) यांची दमदार अर्धशतके आणि मार्क चॅपमनच्या 65 धावांच्या झंझावातासह त्याने जेम्स निशामबरोबर पाचव्या विकेटसाठी केलेल्या 110 धावांच्या भागीमुळे न्यूझीलंडने सहज विजय मिळविला. शाहिन आफ्रिदीच्या अनुपस्थितीत पाकिस्तानी गोलंदाजी बोथट वाटली. दुसरीकडे बांगलादेशने श्रीलंकेला 263 धावांत गुंडाळल्यानंतर तंझीद हसन (84), लिटन दास (61) आणि मेहदी हसन  (67) यांच्या खेळींनी बांगलादेशला 42 व्या षटकातच विजय मिळवून दिला.