
सासमिरा इस्टिट्यूट आँफ मॅनेजमेंट स्टजीजच्यावतीने 10 डिसेंबर रोजी आज सायक्लोथाँनचे आयोजन करण्यात आले आहे.
द एनजीओ मेला या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्वयंसेवी संस्थांना जोडण्याचा याव्दारे प्रयत्न केला जातो. या उपक्रमाच्याव्दारे विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्य लोकांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या सायक्लोथाँनचच्या आँफलाईन नोंदणीची सुरवात सकाळी साडे सहा वाजता होईल. साडे सात वाजता सायक्लाँथाँनला हिरवा झेंडा दाखवून सुरवात होईल. वरळी नाका, श्रीराम मील, लोअरपरळ, कमला मिल मोतीलाल ओस्वाल, पोर्तुगीज चर्च, सिध्दिविनायक मंदिर आणि सासमीर इंस्टिट्यूचे कँपस असा या सायक्लोथाँनचा मार्ग असेल. या उपक्रमात सहभागी होणा-यांना प्रमाणपत्र व पदके दिली जातील

























































