नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचे निधन, 8 वर्षांपासून देत होती कर्करोगाशी लढा

898

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीक याची लहान बहिणी सायमा तामसी सिद्दीकी हिचे वयाच्या 26 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. सायमा ही गेल्या 8 वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होती. शुक्रवारी पुण्यातील एका रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. सायमाची प्राणज्योत मालवली तेव्हा नवाझुद्दीन शूटींगसाठी अमेरिकेत होता.

सायमा हिचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमधील बुढाना येथे घेऊन जाण्यात येणार आहे. तेथे रविवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते. सायमा ही 18 वर्षांची असताना तिला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून ती या कर्करोगासोबत लढा देत आहे.

2018 च्या ऑक्टोबर महिन्यात सायमाच्या वाढदिवशी नवाझुद्दीनने तिच्या या कर्करोगबाबत सांगितले होते. ‘माझी बहिण 18 वर्षांची होती तेव्हा तिला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर ती अधिक शूर झाली. तिने आतापर्यंत सर्व संकटांचा सामना केला आहे. आज ती 25 वर्षांची झाली. अजुनही ती कर्करोगाशी लढा देतेय. तिच्या या लढ्यात तिला साथ देणाऱ्या डॉ. कोप्पिकर आणि डॉ. लालेह बुशरी यांचा मी आभागी आहे’, अशी पोस्ट नवाझुद्दीनने शेअर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या