खराब ब्रेकमुळे यामाहाने 3 लाख स्कूटर परत मागवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रेक खराब असल्याचे कारण देत यामाहा इंडियाने तब्बल 3 लाख स्कूटर परत मागवल्या आहेत. रे झेडआर एफआय हायब्रीड आणि फॅसिनो एफआय हायब्रीड या दोन 125 सीसी पॉवरच्या या स्कूटर आहेत. 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 यादरम्यान बनवलेल्या गाडय़ांबाबत हे निर्देश देण्यात आले आहेत. स्कूटरच्या ठरावीक युनिट्समध्ये ब्रेक लिव्हर नीट काम करत नसल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली होती. यानंतर कंपनीने तातडीने पावले उचलत गाडय़ा परत मागवल्या. केवळ जानेवारी 2022 नंतर तयार करण्यात आलेल्या गाडय़ांबाबतच ही कारवाई करण्यात आली. ब्रेक लिव्हर ग्राहकांना मोफत उपलब्ध करून दिले जातील तसेच मोफत रिप्लेसही करुन देण्यात येतील. तुमच्या गाडीला परत देण्याची गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर जाता येईल. गाडीचा चेसीस नंबर टाकून तपासणी करता येईल असे कंपनीने म्हटले आहे.